राष्ट्रीय निवृत्तीवेतन NPS धारकांना केंद्र शासनाचे एकीकृत निवृत्तीवेतन योजना UPS लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन

एकीकृत निवृत्ती वेतन(UPS)

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना दिनांक 01/ 03/2024 पासून लागू करण्यात येत आहे.
त्याचबरोबर केंद्र सरकारने दिनांक 24 /08 /2024 रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्ती वेतन(UPS) योजना शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे .राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी यांना वरील दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास मुभा राहील.

एक वेळेचा (one time option) विकल्प:

राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळेचा (one time option) विकल्प दिनांक 31/03/ 2025 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा.

मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा वरील प्रमाणे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास सदर एकल्पाचा हे विचार करून ज्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्या संदर्भातील एक विकल्प दिनांक 31/03/2027 पर्यंत किंवा केंद्र शासनाच्या ‘एकीकृत निवृत्तीवेतन योजना’ (unified pension scheme) संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशिलावर मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्याचा नमूद दिनांक यापैकी जो अगोदरचा दिनांक असेल तोपर्यंत फक्त एकदाच देण्याची मुभा राहील.तद्नंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिलेल्या विकल्प कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही.

 

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक ला टच करा  Download 

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ ,शासन निर्णय    Click here

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *