जून, 2024 ते ऑगस्ट, 2024:
जून, 2024 ते ऑगस्ट, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत…
निविष्ठा अनुदान (input subsidy):
अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (input subsidy)स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबी करिता देखील विविध दराने मदत देण्यात येते .शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27 03/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30 /01 2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीच कोसळणे,समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे.
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक ला टच करा Download
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ ,शासन निर्णय Click here