बैलपोळा, नंदी पोळा व बेंदूर असे तीन वेगवेगळे प्रकार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 2 सप्टेंबरला काही भागांमध्ये बैलपोळा साजरा होत आहे.
या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये फार मोठा उत्साह असतो कारण बैल हे वर्षभर शेतामध्ये कष्ट करत असतात आणि शेतकऱ्यांसाठी धान्य देण्यामध्ये त्यांचे योगदान खूप मोठे असते. म्हणून शेतकरी आपल्या बैल साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा शृंगार खरेदी करतात. आपले बैल सजवून ते पोळ्यामध्ये भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ एक मोठ्या आंब्याच्या पानाचे तोरण बांधून ठेवण्यात येते त्या गावातील सर्व बैल जोड्या ढोल, सनया, वाजंत्री वाजवत एकत्र आणले जातात. त्या गावातील मानवाही किंवा ज्याला परंपरेनुसार मान देण्यात आला आहे तो त्या पहिल्यांदा तोरण तोडला जातो व पोळा ‘फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात घेण्यात येतात मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. असा हा पोळ्याचा सण आहे पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हटले जाते. बैल वर्षभर शेतामध्ये राबतो व शेतकऱ्यांसाठी कष्ट करतो त्याप्रती शेतकरी त्या दिवशी त्याची पूजा करून त्याला ओवाळतो. त्याच्याकडे बैले नसतात तो मातीचे बैल तयार करून त्याची घरामध्ये पूजा करतो.
आषाढ श्रावण किंवा भाद्रपद आणि कार्तिक महिन्याच्या अमावस्येला प्रदेशानुसार बैलपोळा सण साजरा केला जातो.
मराठवाडा, विदर्भ भागात श्रावण अमावास्येला बेंदूर साजरा करण्याची परंपरा आहे.
शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त प्राणी म्हणून बैलाला ओळखले जाते आणि या दिवशी शेतकरी बैलाच्या कार्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो त्याला त्याची पूजा करतो त्याला ओवाळतो व त्याला आपण बैलपोळ्याचा सोहळा म्हणतो.