महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 (MAHATET 2024) घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून ही परीक्षा दिनांक 10/ 11 /2024 रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.
इयत्ता १ ली ते ५ वी व इयत्ता ६ वी ते ८ वी साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/ विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमता ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेची संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती ,सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद च्या https ://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळात नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 09/09 2024 पासून सुरू होत असून दिनांक 30 /09 /2024 अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरता येतील संबंधितांनी याची नोंद घ्यावी ही विनंती.
अ.क्र | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
1 | ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी | 09/09/2024 ते 30/09/2024 |
2 | प्रवेश पात्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे | 28/10/2024 ते 10/11/2024 |
3 | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ | दि.10/11/2024 वेळ 10.30 AM ते 13.00 PM |
4 | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 दिनांक व वेळ | दि.10/11/2024 वेळ 14.00 PM ते 16.30 PM |
5 | पुढील वेबसाईटवर फॉर्म भरा व जाहिरात पहा | https://mahatet.in/ जाहिरात |