Site icon Rayatnews.in

कृत्रिम उपग्रह (Artificial satellites)अवकाशात का पाठवले जातात?

Untitled design (35)

कृत्रिम उपग्रह-

“एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारी वस्तू किंवा एखादी छोटा ग्रह म्हणजे त्याला आपण उपग्रह म्हणतो”

उपग्रह दोन प्रकारच्या असतात एक नैसर्गिक उपग्रह उदाहरणांमध्ये चंद्र व दुसरा कृत्रिम उपग्रह की जो मानवनिर्मित असतो.सौर उपग्रह उर्जेवर चालतात आणि त्याला सौरपंखवले असतात.

कृत्रिम उपग्रहाचे कार्य-

  1. कृत्रिम ग्रहाच्या माध्यमातून आपणाला दिशादर्शक ची माहिती अचूकपणे मिळते.
  2. सध्या आपण टीव्हीवर सर्व चैनल पाहतो हे चॅनल पाहण्यासाठी आपणाला कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून सर्व माहिती पुरवली जाते.
  3. हवामानाचा अचूक अभ्यास करण्यासाठी पाऊस केव्हा पडणार आहे याचा अचूक अंदाज घेण्यासाठी आपणाला कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून माहिती मिळते.
  4. शास्त्रज्ञांना वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी कृत्रिम उपग्रहाची फार मोठ्या प्रमाणावर मदत होते.
  5. शेती मुख्यता हवामान व पाऊस या विषयावर अवलंबून असते त्यासाठी शेतकऱ्यांसाठी अचूक माहिती देण्यासाठी कृत्रिम उपग्रह उपयुक्त माहिती आपणाला पाठवतात.
  6. ज्ञानाचे देवाण-घेवाण करण्यासाठी सध्या डिजिटायझेशन चे जग असल्यामुळे माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी कृत्रिम उपग्रह मुख्य भूमिका बजावतात.
Exit mobile version